बातम्या
यश फाऊंडेशनचा शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कर्यक्रम*
By nisha patil - 1/7/2026 1:56:59 PM
Share This News:
**यश फाऊंडेशनचा शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कर्यक्रम*
**आजरा(हसन तकीलदार)*-: पेरणोली ता. आजरा येथील केंद्र शाळेमधे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कु.यश संतोष जाधव हस्ते करण्यात आले . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश जोशीलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, रविंद्र देसाई, ग्रामपंचायत सदस्य रणजित फगरे, उद्योजक संजय दळवी, एकनाथ जोशीलकर आदीजण प्रमुख उपस्थित होते.
कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हाच यामागील हेतू आहे यावेळी यश फाउंडेशनचे संस्थापक संतोष जाधव म्हणाले, यश फाऊंडेशनची स्थापना समाजातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, तसेच सामाजिक सेवेद्वारे प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दिलेले शैक्षणिक साहित्य हे केवळ मदतीचे साधन नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यातील एक छोटीशी गुंतवणूक आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा सेवाभावी कार्यात सहभागी होऊन शिक्षणाचा दीप प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा, हीच अपेक्षा. सर्वांच्या सहकार्याने यश फाऊंडेशन भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील. गीता नाईक म्हणाल्या, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे.यश फाऊंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य, समाजसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. यावेळी शिक्षक धनाजी रावण यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एकनाथ पाटील, नामदेव सावंत, सोपान फगरे, राजेंद्र कळेकर, भाऊ भोकरे, हर्षद लोंढे, काकासो सुतार, संतोष सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यश फाऊंडेशनचा शैक्षणिक साहित्याचे वाटपाचा कर्यक्रम*
|