शैक्षणिक
यशोदा फाऊंडेशन मलिग्रे तर्फे किल्ला स्पर्धेचे आयोजन
By nisha patil - 3/11/2025 10:46:15 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- यशोदा फाऊंडेशन मलिग्रे यांच्या सौजन्याने मलिग्रे येथे भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून मराठी संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचे सुंदर दर्शन घडवले.
कार्यक्रमात विजेत्या मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होते. या माध्यमातून लहानग्यांमध्ये आपल्या परंपरेचा अभिमान, इतिहासाची ओळख आणि संस्कृतीप्रेम जागृत करण्याचा उद्देश साध्य झाला असे आयोजकांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांचे कौतुक करत पुढील काळातही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यशोदा फाऊंडेशनच्या वतीने आयोजकांनी सर्व सहभागी मुलांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले.या स्पर्धेमध्ये अनिकेत महादेव इळके-लोहगड, ओमकार परशुराम जाधव-मरुडजंजीर, प्रांजली चंद्रू पारदे-मल्हारगड, जय जोतिबा साळुंखे-रायगड, अद्विक संदीप भगूत्रे-प्रतापगड, स्वरूप खडगे-तोरणा, शौर्य बुगडे-जंजिरा, रुद्र कोकितकर शिवनेरी अशा प्रकारे स्पर्धाकांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या.
मुलांना आणखीन हुरूप मिळावा आणि आपल्या संस्कृतीचा विसर पडू नये हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचे फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.
यशोदा फाऊंडेशन मलिग्रे तर्फे किल्ला स्पर्धेचे आयोजन
|