बातम्या

पक्ष पुनर्बांधणीसाठी यशवंत किल्लेदार कोल्हापूर दौऱ्यावर.

Yeshvant killedar


By nisha patil - 6/26/2026 11:14:33 AM
Share This News:



पक्ष पुनर्बांधणीसाठी यशवंत किल्लेदार  कोल्हापूर दौऱ्यावर.

राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसे संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदारसो व नंदकुमार चिलेसो हे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी करून नव्या चेहऱ्यांना पक्षांमध्ये समाविष्ट करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी संपर्क अध्यक्ष स्वतः इच्छुकांशी संवाद साधणार आहेत. त्याद्वारे नूतन पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या राजकीय महत्त्वकांक्षा बाळगणाऱ्या युवा वर्ग व अनुभवी लोकांना राजसाहेबांनी ही अनोखी संधी उपलब्ध करून दिलेली असून याचा समस्त कोल्हापूरकरांनी जरूर लाभ घ्यावा.

             महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी व माजी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व पक्षांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांची संपर्क अध्यक्षांशी शुक्रवार दिनांक २६ जून रोजी सकाळी ११ वा. शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे थेट संवाद उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष दौलत पाटील, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोंदकर यांनी केले आहे.

 


पक्ष पुनर्बांधणीसाठी यशवंत किल्लेदार कोल्हापूर दौऱ्यावर.
Total Views: 18