बातम्या
योग प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनेल - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 6/18/2025 9:54:02 PM
Share This News:
योग प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनेल - जिल्हाधिकारी अमोल येडगे
आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, दि. 21 जून रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल यासाठी प्रभावी आणि यशस्वी नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठकीत दिल्या. तसेच, त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींना योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर तसेच व्हीसी द्वारे सर्व तालुका शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
योग प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनेल - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|