बातम्या

योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक , महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली

Yogesh Kumar Gupta is the new Superintendent of Police of Kolhapur

By nisha patil - 5/22/2025 5:02:08 PM
Share This News:

योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक , महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली

 कोल्हापूरच्या पोलिस यंत्रणेत मोठा बदल, गुप्ता यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी

कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस यंत्रणेत मोठे बदल झाले असून, योगेश कुमार गुप्ता यांची कोल्हापूरचे नवीन SP (पोलीस अधीक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे SP महेंद्र पंडित यांची ठाणे येथे बदली झाली असून त्यांनी अल्प काळात कोल्हापूर जिल्ह्यात चांगली कामगिरी बजावली होती. गुप्ता हे महाराष्ट्रातील अत्यंत शिस्तप्रिय आणि कुशल अधिकारी म्हणून ओळखले जातात
 
महेंद्र पंडित यांनी कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या ठिकाणी आता योगेश कुमार गुप्ता हे नवे SP पदभार स्वीकारणार आहेत. नागरिकांमध्ये नव्या अधिकाऱ्यांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

योगेश कुमार गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक , महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली
Total Views: 332