बातम्या

गोकुळच्या डॉ. योगेश गोडबोले यांची आयडीएच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

Yogesh godbole


By nisha patil - 9/6/2026 7:12:24 PM
Share This News:



गोकुळच्या डॉ. योगेश गोडबोले यांची आयडीएच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशन (आयडीए)च्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस चेअरमन) बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे गोकुळसह कोल्हापूरच्या दुग्ध क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसायातील 31 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. गोडबोले यांनी सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय दुग्ध क्षेत्रात विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

सध्या ते सुमारे 4200 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

निवडीनंतर डॉ. गोडबोले यांनी गोकुळच्या संचालक मंडळाचे, प्रशासनाचे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानले. पश्चिम विभागातील दुग्ध व्यवसाय अधिक तंत्रज्ञानाधारित, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गोकुळच्या डॉ. योगेश गोडबोले यांची आयडीएच्या पश्चिम विभाग उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
Total Views: 9