बातम्या
तू माझ्या जवळ असायला पाहिजेस! रंकाळा एसटी डेपोत महिला सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तनाचा आरोप!
By nisha patil - 10/31/2026 9:33:55 PM
Share This News:
तू माझ्या जवळ असायला पाहिजेस! रंकाळा एसटी डेपोत महिला सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तनाचा आरोप!
कोल्हापुरातील रंकाळा एसटी डेपोत महिला सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भेटण्यासाठी वारंवार दबाव, दारू पार्टीची व्यवस्था करण्याची मागणी आणि थेट हात पकडल्याचा गंभीर आरोप एका महिला सुरक्षारक्षकाने केला आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या रंकाळा बसस्थानकावर महिला सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने भानुदास कमलाकर मदने यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फेब्रुवारी २०२६ मध्ये मदने यांनी एका कर्मचाऱ्यामार्फत संध्याकाळी दारू पार्टीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र, संबंधित महिलेने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर वैयक्तिक बोलण्यासाठी फोन करणे, बाहेर भेटण्याचा आग्रह धरणे आणि वारंवार भेटण्याबाबत विचारणा करणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तकेच नव्हे, तर 'तू माझ्या जवळ असायला पाहिजेस, म्हणून मीच तुझी बदली केलेली आहे. आता कशी येत नाहीस ते बघतो,' अशा शब्दांत धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, १ ऑगस्ट २०२६ रोजी बदलीच्या संदर्भात मध्यवर्ती बसस्थानकात भेटण्यासाठी गेल्या असताना पुन्हा भेटण्याचा आग्रह धरत हात पकडल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याचे सांगत संबंधित महिलेने पोलिसांत कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
तू माझ्या जवळ असायला पाहिजेस! रंकाळा एसटी डेपोत महिला सुरक्षारक्षकासोबत गैरवर्तनाचा आरोप!
|