बातम्या
गोविंदराव टेंबे यांच्यावरील यूट्यूब चॅनलचे लोकार्पण कोल्हापुरात संपन्न
By nisha patil - 6/6/2025 3:36:30 PM
Share This News:
गोविंदराव टेंबे यांच्यावरील यूट्यूब चॅनलचे लोकार्पण कोल्हापुरात संपन्न
सुबोध भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीतकार टेंबे यांच्या कार्याला डिजिटल सलामी
कोल्हापूर : ज्येष्ठ संगीतकार पं. गोविंदराव टेंबे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्यावरील विशेष यूट्यूब चॅनलचे लोकार्पण दि. 5 जून रोजी कोल्हापुरातील गोविंदराव टेंबे सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी टेंबे यांचे संगीत व विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी या उपक्रमाचे कौतुक केले.
सौमित्र पोटे यांनी हे चॅनल सुरू केला असून, लवकरच त्यावर टेंबे यांचे जीवनकार्य, संगीतकृती आणि अभ्यासपूर्ण चर्चा रसिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमात भावस्पर्शी सांस्कृतिक सादरीकरण झाले. यावेळी मोठ्या संख्येने रसिक, कलाकार, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
गोविंदराव टेंबे यांच्यावरील यूट्यूब चॅनलचे लोकार्पण कोल्हापुरात संपन्न
|