बातम्या
डीजेच्या दणदणाटामुळे तरुणाचा मृत्यू...
By nisha patil - 8/9/2025 3:26:52 PM
Share This News:
डीजेच्या दणदणाटामुळे तरुणाचा मृत्यू...
विसर्जन मिरवणुकीत शोकांतिका; १७ वर्षीय तरुणाचा डीजेनंतर मृत्यू
भगवतीपूर (ता. राहाता) येथे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत भगवतीपूर येथे दुःखद घटना घडली. थडीफाटा वस्तीवरील ओंकार रवींद्र खर्डे (१७) हा तरुण डीजेच्या दणदणाटात नाचल्यानंतर अचानक कोसळला व त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणारा ओंकार हा गावातील माजी सरपंच रावसाहेब खर्डे यांचा नातू होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून अंत्यसंस्काराला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डीजेच्या दणदणाटामुळे तरुणाचा मृत्यू...
|