खेळ
युवा विश्वचषक : भविष्यातील क्रिकेटची रंगीत झलक
By nisha patil - 1/15/2026 4:31:15 PM
Share This News:
आयसीसी यू-१९ वन-डे विश्वचषक स्पर्धेला गुरुवार (दि. १५) पासून प्रारंभ होत असून, सलामीच्या लढतीत भारत आणि अमेरिका हे युवा संघ आमनेसामने येणार आहेत. यंदाची ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरणार आहे. प्रथमच ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया या आफ्रिकन देशांमध्ये आयोजित करण्यात आली असून, त्यामुळे जागतिक क्रिकेटचा विस्तार अधिक व्यापक होत असल्याचे चित्र दिसून येते.
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले असून, त्यांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात आली आहे. साखळी फेरीनंतर सर्वोत्तम १२ संघ ‘सुपर सिक्स’ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर दोन गटांमधून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ही रचना केवळ स्पर्धात्मकतेत भर घालणारी नसून, युवा खेळाडूंना सातत्य सिद्ध करण्याची मोठी संधी देणारी आहे.
१५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड, अमेरिका आणि बांगलादेशसारखे संघ सहभागी असून, आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी ही स्पर्धा प्रतिभावान खेळाडू घडवण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. याच विश्वचषकातून उद्याचे क्रिकेटतारे घडणार असल्याने, क्रिकेटविश्वाचे लक्ष या युवा लढतींकडे लागले आहे.
युवा विश्वचषक : भविष्यातील क्रिकेटची रंगीत झलक
|