बातम्या

शाहुपुरीत नशिले इंजेक्शन विक्री करणारा युवक अटक; 66,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Youth arrested for selling drug injections in Shahupuri


By nisha patil - 5/12/2025 12:18:04 PM
Share This News:



कोल्हापूर | 04 डिसेंबर 2025 (ता. 14:40 वा.)

शाहुपुरी पोलिसांनी आयर्विन हायस्कूल समोरील परिसरात गुप्त बातमीदाराच्या मदतीने सापळा लावून नशिले इंजेक्शन विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून थेट 66,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक झालेल्या आरोपीचे नाव –
ऋषभ रविंद्र आडके (वय 25, रा. नरसिंह कॉलनी, नाना पाटील नगर, कोल्हापूर).

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, फिर्यादी हुतात पाटील (पो. डॉ. 1778) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी हा परवानगीशिवाय नशिली औषधे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई राबवली.

जप्त केलेला मुद्देमाल

MEPHENTERMINE SULPHATE इंजेक्शनच्या 50 सिलबंद काचेच्या बॉटल्स
किंमत – प्रत्येकी ₹334.80, एकूण ₹16,740

गोल्डन कलर मोबाईल हँडसेट – ₹2,000

अ‍ॅक्सीस मोपेड (MH-09-FW-56) – ₹48,000


एकूण जप्त मालाची किंमत : ₹66,740

पोलिसांनी सांगितले की आरोपी तरुणांना नशिली इंजेक्शन विक्री करण्यासाठी येत होता. त्याच्याकडील इंजेक्शन हा वैद्यकीय परवानगीशिवाय विक्रीस मनाई असलेला प्रकार असून तो बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला होता.

कारवाईत सहभागी अधिकारी

मा. पोलीस अधीक्षक – श्री. योगेशकुमार

अप्पर पोलीस अधीक्षक – श्री. डॉ. बी. धीरजकुमार

पोलीस उपअधीक्षक – श्रीमती प्रिया पाटील

पोलीस निरीक्षक – श्री. संतोष होके

सहायक पोलीस निरीक्षक – चेतन मसूटगे

पोलीस उपनिरीक्षक – आकाश आधव

अंमलदार – भैरु माने, मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, महेश पाटील, सुशिलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर


गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे हे करीत आहेत


शाहुपुरीत नशिले इंजेक्शन विक्री करणारा युवक अटक; 66,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 29