बातम्या

कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुणाला अटक! एलसीबीची शिरोलीत मोठी कारवाई!

Youth arrested with a country


By nisha patil - 10/14/2026 9:40:10 AM
Share This News:



कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुणाला अटक! एलसीबीची शिरोलीत मोठी कारवाई!

 

कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिरोली परिसरात मोठी कारवाई केली आहे. गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्रीसाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल संजय मोरे, वय २२, रा. जयभीमनगर झोपडपट्टी, इचलकरंजी, असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, राहुल मोरे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील सांगली फाटा, शिरोली येथील भारत पेट्रोल पंपाजवळ पिस्टल आणि काडतूस विक्रीसाठी येणार होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


कोल्हापुरात गावठी पिस्टलसह तरुणाला अटक! एलसीबीची शिरोलीत मोठी कारवाई!
Total Views: 13