बातम्या

नेर्लीत पैशांसाठी तरुणावर हल्ला; चौघांविरोधात गुन्हा!

Youth attacked for money in Nerli


By nisha patil - 11/27/2026 3:09:37 PM
Share This News:



नेर्लीत पैशांसाठी तरुणावर हल्ला; चौघांविरोधात गुन्हा!

पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणाला काठी, काचेच्या बिअरच्या बाटलीने आणि हातातील कड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना करवीर तालुक्यातील नेर्ली येथे घडली आहे. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी चार रेकॉर्डवरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींची परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तींना कडक इशारा दिला आहे.

रमेश अमृत जाधव (वय ३६) हे २१ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मित्राला आणण्यासाठी नेर्ली येथील पाटील बारजवळील चायनीज सेंटर परिसरात गेले होते. यावेळी अजय म्हाकवे, आतिन माळी, ऋषिकेश मांडरेकर आणि अजय व्हनकुरे यांनी त्यांची मोटारसायकल अडवली. तू आम्हाला पैसे देणार नाही काय? असा जाब विचारत पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर चौघांनी काठी, बिअरच्या बाटलीने, हातातील कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये जाधव यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला डोळ्याजवळ दुखापत झाली. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

दरम्यान, गोकुळ शिरगाव औद्योगिक परिसर आणि नेर्ली भागात नागरिक, उद्योजक तसेच कामगारांना धमकावून पैसे उकळण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारांना बळी पडलेल्या नागरिकांनी भीती न बाळगता थेट पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


नेर्लीत पैशांसाठी तरुणावर हल्ला; चौघांविरोधात गुन्हा!
Total Views: 12