बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘गरबा-दांडिया’ वर थिरकली तरुणाई
By nisha patil - 9/29/2025 4:36:43 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘गरबा-दांडिया’ वर थिरकली तरुणाई
विवेकानंद कॉलेजमध्ये नवरंगी नवरात्री उत्सव निमित्त गरबा-दांडिया स्पर्धा संपन्न
कोल्हापूर दि . 29 : येथील विवेकानंद कॉलेज,कोल्हापूर मधील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्र, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सचेतना मंडळ आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त्ा विद्यमाने नवरंगी नवरात्री उत्सवानिमित् गरबा-दांडिया नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर कॉलेज गटातील एकूण 13 संघानी सहभाग नोंदवून बहारदार नृत्य सादरीकरण केले.
या स्पर्धा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये संपन्न झाल्या. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.श्रुती जोशी, डॉ.कविता तिवडे, डॉ. सिध्दार्थ कट्टीमनी, प्रा.सनी काळे, प्रा पल्लवी देसाई, डॉ.राजश्री पाटील, प्रा गीतांजली साळुंखे, प्रा. सौ एस पी वेदांते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना मा.प्राचार्य डॉ आर आर कुंभार म्हणाले की, शारदीय नवरात्र उत्सवानिमित् गरबा व रास दांडिया स्पर्धांचे आयोजन म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान आणि आदर होय. विद्यार्थ्यांना विविध कलागुणांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ नवरात्र उत्सवानिमित उपलब्ध झाले असून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरणारे आहे. आपली भारतीय परंपरा आणि संस्कृती जतन करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. महाविद्यालयाने राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा असून पुढील शैक्षणिक वाटचालीत उर्जा मिळवून देणारा आहे.
सदर स्पर्धेमध्ये सिनिअर कॉलेज गटात प्रथम क्रमांक सांस्कृतिक विभाग विद्यार्थी ग्रूप, व्दितीय क्रमांक नीलम पुरोहित आणि ग्रूप व तृतीय क्रमांक वृषाली पाटील आणि ग्रूप यांनी मिळविला. तर ज्युनिअर कॉलेज गटात प्रथम क्रमांक बीट बेकर्स ग्रूप, व्दितीय क्रमांक गुज्जु गाईज व ग्रूप व तृतीय क्रमांक देसी गर्ल्स ग्रूप यांनी मिळविला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिस रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्टीवन पौलस व नेहा भस्मे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. स्वागत प्रा.सौ शिल्पा भोसले यांनी केले. आभार डॉ ए.एस.महात यांनी मानले. सुत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. या प्रसंगी ज्युनिअर व सिनिअर कॉलेजच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘गरबा-दांडिया’ वर थिरकली तरुणाई
|