बातम्या
संध्यामठजवळ पूर्व वैमानस्यातून तरुणाचा खून
By nisha patil - 4/24/2025 6:10:22 PM
Share This News:
संध्यामठजवळ पूर्व वैमानस्यातून तरुणाचा खून
कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या संध्यामठ गल्लीमध्ये बुधवारी रात्री खंजीरने भोसकुन तरुणाचा खून करण्यात आला आहे. प्रशांत भीमराव कुंभार असं निवृत्ती चौक इथं राहणाऱ्या मयत तरुणाचं नाव आहे.हा खून नाथा गोळे तालीम इथं राहणाऱ्या नरेंद्र राजाराम साळोखे या संशयीताने केल्याचे कुंभार याच्या मित्रांनी सांगितलंय.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुंभार आणि साळोखे यांच्यात काही वर्षांपासून वाद आहे. कुंभार हे बुधवारी रात्री संध्यामठ गल्लीतील एका हॉटेलच्या परिसरात मित्रांसह जेवायला गेले होते. रात्री बाराच्या सुमारास साळोखे तेथे आला. त्यांच्यात किरकोळ वाद झाला. वादानंतर साळोखे याने खंजीरसारख्या धारदार हत्याराने कुंभार यांना भोसकले. हल्ल्यानंतर साळोखे तेथून पसार झाला. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत कुंभार याला त्याच्या मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत
संध्यामठजवळ पूर्व वैमानस्यातून तरुणाचा खून
|