विशेष बातम्या

युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुजरात येथील गिरनार पर्वत केला सर..

Yuva Sena West Maharashtra Secretary Rituraj Kshirsagar


By nisha patil - 10/7/2025 10:33:03 PM
Share This News:



युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुजरात येथील गिरनार पर्वत केला सर..

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या उदंड आयुष्यासाठी केली प्रार्थना...

युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्त आज गुजरात मधील गिरनार पर्वत सर करत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन, आपल्या आई वडील म्हणजेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि सौ वैशाली क्षीरसागर  यांना उदंड आयुष्य, यश लाभावे तसेच त्यांच्या हातून होत असलेले जनसेवेचे व्रत असेच अखंड चालू राहावे, यासाठी प्रार्थना केली.
 

 युवा सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह  कोल्हापुरातून निघून गिरनार येथे जाऊन आज दहा हजार पायऱ्या ऋतुराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन ते चार तासाच्या अंतरात पूर्ण केल्या. गिरनार स्थित श्री दत्तगुरूंच्या मंदिरात मनोभावे पूजा करून  आपल्या आई-वडिलांचे आयुष्य वाढावे, आणि गेली दोन दशकाहून अधिक काळ अविरतपणे सुरू असलेले  कोल्हापूरकरांच्या सेवेचे व्रत  त्यांच्या हातून  असेच घडत राहावे, यासाठी त्यांनी प्रार्थना केली..


युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी गुजरात येथील गिरनार पर्वत केला सर..
Total Views: 72