शैक्षणिक
शाळा-कोलेजांमध्ये ड्रग्सविरोधी मोहीम राबवण्याची युवासेनेची मागणी
By nisha patil - 7/14/2025 9:50:25 PM
Share This News:
शाळा-कोलेजांमध्ये ड्रग्सविरोधी मोहीम राबवण्याची युवासेनेची मागणी
विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्सची सूचना
कोल्हापूर शहरात वाढत्या गांजा व ड्रग्सच्या वापराबाबत चिंता व्यक्त करत, शाळा व महाविद्यालयांमधूनच जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणीचं निवेदन आज उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं.
विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक अटेंडन्ससह मोहिम राबवावी आणि ‘निर्भया पथका’प्रमाणे टास्क फोर्सची स्थापना करावी, अशी सूचना निवेदनात आहे.
उपजिल्हाधिकारी तेली यांनी लवकरच शाळा-कोलेजांना सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.
या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शहर प्रमुख ओंकार मंडलिक, अमित बाबर, सनराज शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शाळा-कोलेजांमध्ये ड्रग्सविरोधी मोहीम राबवण्याची युवासेनेची मागणी
|