बातम्या
कोल्हापूर : युवाशक्ती दहीहंडीला कोल्हापुरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
By nisha patil - 8/23/2025 10:45:20 PM
Share This News:
कोल्हापूर : युवाशक्ती दहीहंडीला कोल्हापुरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेली लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४ वाजता दसरा चौक मैदानावर रंगणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील नागरिकांना या दहीहंडी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या भव्य सोहळ्याच्या उद्घाटनासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दहीहंडीला भेट देणार आहेत.
स्पर्धेत विजेत्या गोविंदा पथकाला ३ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून, विविध थर लावून सलामी देणाऱ्या पथकांना वेगवेगळी बक्षिसे देण्यात येतील.
याशिवाय सर्व गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कवच देण्यात आले असून, त्यांच्या सुरक्षेसाठी समीट अॅडव्हेंचर आणि हिल रायडर्सचे कार्यकर्ते सज्ज राहणार आहेत. भागीरथी महिला संस्थेकडून सर्व पथकांना खाद्यपदार्थ पॅकेटचे वितरण केले जाईल.
यंदा तरुणाईसाठी खास आकर्षण म्हणून युवाशक्ती दहीहंडी रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, उत्कृष्ट रिल्स बनवणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत.
सोहळ्याची सुरुवात श्रीमंत ढोलताशा पथक आणि सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होईल. भव्य व्यासपीठ, उत्तम ध्वनी-प्रकाश व्यवस्था, महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असे सर्व नियोजन करण्यात आले आहे. दहीहंडीचा थेट प्रक्षेपण चॅनल बी वर होणार आहे.
👉 रविवारी सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात होणाऱ्या या दहीहंडी सोहळ्याला कोल्हापुरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी आवाहन केले आहे.
कोल्हापूर : युवाशक्ती दहीहंडीला कोल्हापुरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
|