बातम्या

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहात

Yuvavers celebrated with enthusiasm at DY Patil Polytechnic


By nisha patil - 9/14/2026 8:58:36 PM
Share This News:



डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहात

कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी युवावर्स हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यामधील विविध स्पर्धामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेसह आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला. 

युवावर्समध्ये वक्तृत्व स्पर्धा, लॅन गेमिंग, गेस अँड गिगल, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. तसेच नृत्य स्पर्धेमध्ये वीस ग्रुपने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी बोलताना डॉ. गुप्ता यांनी, अभियांत्रिकी शिक्षणाचं महत्व विशद करत विद्यार्थ्यांनी फक्त डिग्री मिळवण्यापर्यंत न थांबता संशोधनातुन समाज हित साधण्याचे आवाहन केले.
 

या स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. नृत्य स्पर्धेसाठी रविराज मोरे आणि रणजीत दुधाणे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

तसेच मेकॅनिकल सिविल आणि कॉम्प्युटरविभागातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, विभागप्रमुख डॉ.पी.के. शिंदे, प्रा.अक्षय करपे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. शितल साळोखे आदी उपस्थित होते.

कसबा बावडा -युवावर्स स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करताना डॉ. महादेव नरके, सोबत उपप्राचार्य नितीन माळी, रविराज मोरे, रणजीत दुधाने आणि सर्व विभागप्रमुख


डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहात
Total Views: 11