बातम्या
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करा
By nisha patil - 3/10/2025 3:23:57 PM
Share This News:
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करा
कोल्हापूर, दि. 3 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 ही अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अन्वये राबविण्यात येत आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी त्याबाबतचा 10 लाख रुपयांपर्यंतचा ( 22 ऑक्टोबर 2023 चा शासन निर्णयाअन्वये तसेच दिनांक 21 ऑगस्ट 2024 चा शासन शुध्दीपत्रकान्वये एकूण 12 पायाभूत सोयीसुविधांचे जसे विद्यार्थ्यांकरिता शुध्द पयेजलाची व्यवस्था करणे व इन्वर्टर, जनरेटरची सुविधा निर्माण करणे) परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यांक विभाग अधिकारी यांनी केले आहे.
प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटींची पुर्तता करुन अंतिमरित्या या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल.
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करा
|