बातम्या
झाकीर खानचा मानाचा तुरा
By nisha patil - 8/19/2025 11:44:18 AM
Share This News:
झाकीर खानचा मानाचा तुरा!
मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये शो करणारा पहिला भारतीय कॉमेडियन
भारतातील प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खानने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित मॅडिसन स्क्वेअर गार्डन या जागतिक स्तरावर सुप्रसिद्ध स्थळी शो करणारा तो पहिला भारतीय कॉमेडियन ठरला आहे.
झाकीर खानने आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवून लोटपोट करताना भारतीय कॉमेडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळे स्थान मिळवून दिले. त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्रचंड गर्दी उसळली होती.
स्टँड-अप कॉमेडी क्षेत्रात झाकीर खान हा आधीपासूनच लोकप्रिय नाव आहे. त्याच्या “सख्त लोंडा” या पंचलाइनमुळे तो घराघरात पोहोचला. आता त्याच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे भारतीय कॉमेडियनसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.
भारतीय कलावंतांसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला असून चाहत्यांकडून झाकीर खानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
झाकीर खानचा मानाचा तुरा
|