बातम्या

*कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे झारा माणगावकर हिचा गौरव

Zhara Mangaonkar felicitated


By nisha patil - 9/14/2026 8:54:20 PM
Share This News:



*कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे झारा माणगावकर हिचा गौरव

*झाराच्या यशाची घोडदौड कायम
 

*आजरा(हसन तकीलदार):-कास्ट्राईब शिक्षक संघटना आजरा तालुका शाखेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल झारा तोहीद माणगावकर हिचा व तिचे मार्गदर्शक शिक्षक रिजवान माणगावकर यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक भेट देऊन गौरवण्यात आले.
       

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी गस्ती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गौतम वर्धन, सुनीत चंद्रमणी, पी. डी. सरदेसाई, तुकाराम संघवी, विजय कांबळे, श्रीनाथ पाटील, किरण आमनगी, सुभाष कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कांबळे यांनी केले तर दिलीपकुमार राजदीप यांनी संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन केले. सूत्रसंचलनाची जबाबदारी दीपक कांबळे व दशरथ कांबळे यांनी पार पाडली.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव नाईक, भिकाजी कांबळे, बाळू कांबळे व महेश कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
   

पीएमश्री उर्दू मराठी विद्या मंदिर आजराची विद्यार्थीनी झारा माणगावकर हिने इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे. याबरोबरच तीने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत यशाला गवसणी घातली आहे. तालुकास्तरीय नाट्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक, जिटीएस गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत, कथाकथन स्पर्धेत, वक्तृत्व स्पर्धेत,क्वीझ स्पर्धेत अशा विविध स्पर्धेत याअगोदरही यश संपादन करून तीने पीएमश्री उर्दू मराठी विद्या मंदिरचे नाव उज्वल केले आहे.
 

 शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच मार्गदर्शक शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणारा हा उपक्रम कौतुकास पात्र ठरला आहे. शेवटी आभार नागेश सुतार यांनी मानले.


*कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे झारा माणगावकर हिचा गौरव
Total Views: 67