बातम्या
१६ सप्टेंबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा; तब्बल ५ लाखांचे बक्षीस
By nisha patil - 10/9/2025 5:43:05 PM
Share This News:
१६ सप्टेंबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा; तब्बल ५ लाखांचे बक्षीस
महासैनिक दरबार हॉलमध्ये पारंपरिक खेळांचा जल्लोष
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था, युवती मंच व नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित झिम्मा-फुगडी स्पर्धा यंदा १६ सप्टेंबर रोजी महासैनिक दरबार हॉल येथे रंगणार आहे. तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी दिली.
स्पर्धेत झिम्मा, फुगडी, उखाणे, घागर घुमविणे, सूप नाचविणे यांसह पारंपारिक खेळ होणार असून, महिला भगिनींसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धेचा आनंद चॅनल बीवर थेट प्रक्षेपणातून घेता येणार आहे.
१६ सप्टेंबरला झिम्मा-फुगडी स्पर्धा; तब्बल ५ लाखांचे बक्षीस
|