बातम्या
'शू...झोपलेत सगळे' एकांकिकेचे गडहिंग्लज मध्ये सादरीकरण
By nisha patil - 6/10/2025 4:04:33 PM
Share This News:
'शू...झोपलेत सगळे' एकांकिकेचे गडहिंग्लज मध्ये सादरीकरण
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे 'शू... झोपलेत सगळे' या एकांकिकेचे शनिवारी (दि. 4) गडहिंग्लज येथील कला अकादमी हॉल येथे सादरीकरण करण्यात आले.
देशातलं गढूळ राजकारण, भ्रष्टाचार, महिलांवर होत असलेले अत्याचार, दंगल यांसारख्या गंभीर विषयांना हात घालत माणसांची होत असलेली द्विधा अवस्था यांची गुफंण असा या एकांकिकेचा आशय होता. समाजात इतक्या गंभीर घटना घडत असतानाही, माणुसकी हरवून बसलेला माणूस केवळ आपल्या कुटुंबाभोवती आखलेल्या चौकटीबाहेर पडायला तयार नाही. त्याला या गंभीर घटनांचे पडसाद आपल्या कुटुंबावर पडू नयेत, याची काळजी आहे. माणसाच्या या स्वार्थी आणि सुरक्षित मानसिकतेचे चित्रण एकांकिकेतून करण्यात आले. विकास कांबळे यांनी या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन केले होते..
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने 25 सप्टेंबरला 'महिला नाट्य महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य महोत्सवात या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकवला होता.
या एकांकिकेत आसावरी लोहार, प्रियांका माने, श्वेता देसाई, आर्या मोहिरे, समृद्धी माळी, संजना परब, रिया बेतम, विजया वाडकर हे कलाकार होते. तर प्रकाशयोजना व नेपथ्य अजय सातर्डेकर, होमदेव सलगर, विनायक लोहार यांनी पाहिले...
'शू...झोपलेत सगळे' एकांकिकेचे गडहिंग्लज मध्ये सादरीकरण
|