राजकीय
जिल्हा परिषद निवडणूक 2025 : महिला सशक्तीकरणाचा मोठा टप्पा — 68 पैकी 34 जागा महिलांसाठी आरक्षित
By nisha patil - 10/13/2025 1:22:19 PM
Share This News:
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत आज निवडणूक आयोगाने जाहीर केली. यावेळी आयोगाने एकूण 68 जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे महिला प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ होणार आहे. अनुसूचित जमाती महिला आरक्षण या गटात नांदणी (गट क्र. 25) ही जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
अनुसूचित जाती महिला आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकूण 9 गट असून त्यापैकी दानोळी, भादोले, अब्दुल लाट, आळते, कसबा सांगाव या ठिकाणी महिला आरक्षण निश्चित झाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण मागास प्रवर्गात कोतोली, तुडीये, माणगाव, सिद्धनेर्ली, कापसी, कळे, घुणकी, आकुर्डी, यड्राव या जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण सर्वसाधारण श्रेणीत कोरोची, कसबा तारळे, कुदनुर, कळंबे तर्फ ठाणे, शिंगणापूर, कुंभोज, गिजवणे, येवलुज, चिखली, गारगोटी, अडकूर, बोरवडे, आंबर्डे, कडगाव, पिंपळगाव, दत्तवाड, सरवडे, तिसंगी, सांगरूळ या 19 जागा महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत.
यामुळे एकूण 34 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव झाल्या असून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व आणखी बळकट होणार आहे. या सोडतीनंतर महिला नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेक ठिकाणी आगामी निवडणुकीची रणनीती आखण्याची लगबग सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणूक 2025 : महिला सशक्तीकरणाचा मोठा टप्पा — 68 पैकी 34 जागा महिलांसाठी आरक्षित
|