ताज्या बातम्या
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला वेग
By nisha patil - 1/15/2026 4:22:17 PM
Share This News:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू होत असून, १३६ मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दि. १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. अर्जांची छाननी दि. २२ जानेवारी रोजी, तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दि. २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप होणार आहे.
चिन्हवाटपानंतर प्रचारासाठी अवघे आठ दिवस मिळणार असून, कमी वेळेमुळे उमेदवार आणि पक्षांची कसोटी लागणार आहे. निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे.
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला वेग
|