बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

Zilla Parishad and Panchayat Samiti to release reservation on October 13


By nisha patil - 1/10/2025 9:27:11 PM
Share This News:



जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला

कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली आहे. येत्या १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत पार पडणार असून, जिल्हा परिषदेची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समित्यांची सोडत संबंधित तालुका ठिकाणी घेण्यात येणार आहे.

निवडणुकांमधील विविध प्रवर्गांसाठी — महिलांसह अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय — आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १० ऑक्टोबरला जाहीर सूचना प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दरम्यान, या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना गती मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात काही याचिका न्यायालयात दाखल असल्याने निवडणूक प्रक्रिया विलंबाची शक्यता नाकारता येत नाही.


जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला
Total Views: 56