बातम्या

आजरा नगरपंचायतीच्या सभेत खडाजंगी; पाणीपुरवठा, स्वच्छतेवरून विरोधक आक्रमक

ajra nagar panchayat general meeting opposition questions


By Administrator - 11/26/2026 4:53:55 PM
Share This News:



आजरा नगरपंचायतीच्या सभेत विविध विषयांवर खडाजंगी; विरोधकांकडून कामकाजावर नाराजी

 आजरा नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी काशिनाथआण्णा चराटी सभागृहात पार पडली. या सभेत पाणीपट्टी, नळ कनेक्शनला मीटर, फिश मार्केट, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्वच्छता आणि विविध विकासकामांवर चर्चा झाली.

आपटे कॉलनीतील उद्यानाची दुरवस्था, स्वच्छता आणि सुविधांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तसेच कचरा उठावासाठी अपुरे मनुष्यबळ, पाणीपुरवठा योजनेच्या सर्वेक्षणातील त्रुटी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला वारंवार मुदतवाढ देण्यावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

नळ कनेक्शनला मीटर बसवण्याबाबत योग्य माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष चराटी यांनी स्पष्ट केले. तर नाईक गल्लीतील अनावश्यक वॉटर एटीएम गरजेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना नगरसेवक आसिफ सोनेखान यांनी केली.

दरम्यान, आजऱ्यातील फिश मार्केटसाठी तीन कोटी रुपये आणि विविध विकासकामांसाठी चार कोटींपर्यंत निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. निधीचा योग्य वापर करून आवश्यक विकासकामे पूर्ण करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सभेला उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आजरा नगरपंचायतीच्या सभेत खडाजंगी; पाणीपुरवठा, स्वच्छतेवरून विरोधक आक्रमक
Total Views: 124