बातम्या

आंबोली घाटात भीषण अपघात कार दरीत कोसळूनही चौघे सुखरूप

amboli ghat car falls into gorge sawantwadi family safe


By nisha patil - 2/7/2026 11:35:03 AM
Share This News:



सावंतवाडी | प्रतिनिधी : शुभम गवस 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात बुधवारी (२ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावंतवाडी तालुक्यातील बाहेरचावाडा येथील एकाच कुटुंबातील सदस्यांची कार रस्त्यालगतच्या धबधब्याजवळील दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने सर्वजण बचावले असून तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातातील जखमींमध्ये शहबाज रखानजी (वय ३५, चालक), अगन बेग (वय २२), नजीग सय्यद (वय ३५) आणि अब्रार चौधरी (वय २५) यांचा समावेश आहे. यापैकी तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या धबधब्यालगतच्या दरीत कोसळली. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

घटना लक्षात येताच परिसरातील प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने कारमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताची माहिती गेळे गावचे सरपंच सागर होकरे यांनी दिली.


आंबोली घाटात कार दरीत कोसळली; सावंतवाडीतील एकाच कुटुंबातील चौघे थोडक्यात बचाव
Total Views: 21