मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेते अशोक ‘मामा’ सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर
By nisha patil - 9/17/2025 1:32:48 PM
Share This News:
कोल्हापूर :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेतर्फे दिला जाणारा यंदाचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक (मामा) सराफ यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारामध्ये मानपत्र व रोख ५१ हजार रुपये असे स्वरूप असून, कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वितरण सोहळा होणार आहे.
मराठी रंगभूमी, नाटक आणि चित्रपटसृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने चार दशके रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने अभिनेते व चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक ‘मामा’ सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार जाहीर
|