राजकीय

बारामतीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजयुमोचा सेवाभावी उपक्रम; कृष्णराज महाडिक यांचा सहभाग

baramati bjp yuva morcha service camp sant tukaram palkhi krushnaraj mahadik


By Shivani - 7/16/2026 5:30:52 PM
Share This News:



संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजयुमोचा सेवाभावी उपक्रम; कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांची सेवा

बारामती : संत तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बारामती येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने वारकऱ्यांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांसमवेत विठ्ठल नामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना खाऊचे वाटप केले. हजारो वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वारकरी परंपरेतील निस्वार्थ सेवाभाव जपत भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यासोबतच पालखी मार्गावर वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला होता. या कक्षातून वारकऱ्यांना प्राथमिक आरोग्य सेवा, आवश्यक औषधे आणि वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले. पायी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम विशेष स्वरूपात राबविण्यात आला.

या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजसेवा, मानवता आणि वारकरी संप्रदायातील सेवाभावाची परंपरा जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलवनकर, भाजपा युवा नेते सचिन जायभाई, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Sant Tukaram Maharaj Palkhi | Krushnaraj Mahadik | BJP Yuva Morcha
Total Views: 7