राजकीय

भडगावमध्ये ग्रामदैवत हनुमान देवालयाचा वास्तुशांती व कलशारोहन सोहळा उत्साहात

bhadgav kalashrohan news


By nisha patil - 5/31/2025 2:52:30 PM
Share This News:



      
भडगाव, दि. ३१:परमेश्वराने शेकडो मंदिराचे बांधकाम आणि जीर्णोदराचे भाग्य मला मिळवून दिले.  त्यामुळेच माझे जीवन कृतार्थ आणि आनंदी आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. आजतागायत मी लोकभावनेनुसार काम करीत आलो आहे. देव- देवतांच्या आशीर्वादाच्या पुण्याईची कवचकुंडले माझ्या सभोवती आहेत, असे ते म्हणाले.

भडगाव ता. कागल येथील ग्रामदैवत हनुमान देवालयाच्या वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  
        
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आपली श्रद्धा असलेल्या देवालयासाठी ग्रामस्थ किती अंतकरणापासून समर्पित भावनेने पुढे येतात, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे हनुमान देवालय आहे. ग्रामस्थांसह विशेषत: माहेरवाशींनीही मोठ्या भक्तीभावाने या मंदिरासाठी मोठे योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.
      
सुशोभीकरणासाठीही निधी देणार.....!
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरासाठी ७०  लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच; ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एक कोटी रुपयांचे सुंदर मंदिर निर्माण झाले आहे. मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरण व विद्युतीकरणासाठीही २० लाख रुपये आणि शाळा खोल्यांसाठीही निधी देणार असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जाहीर केले.
           
यावेळी माजी सरपंच दिलीप चौगुले यांचेही मनोगत झाले.  
      
यावेळी माजी सरपंच एम. एस. पाटील, सुरेशआण्णा सूर्यवंशी, सरपंच बी. एम. पाटील,  बिद्री साखर कारखान्याचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी सरपंच दिलीप चौगुले, ज्ञानदेव मांगोरे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रणजीत मुडूकशिवाले, उपसरपंच सौ.  प्रतिभा मांगोरे, पी. आर. पाटील, ज्ञानदेव पाटील, बाबासाहेब चौगले, मधुकर सुतार, समाधान राणे, सचिन पाटील, बाळासाहेब कोथमिरे, चंद्रकांत भांडवले, मधुकर कांबळे, मारुती गुरव, गजानन भारमल, नितीन पाटील, रणजीत खतकर, रणजीत विभूते, विश्वनाथ खतकर, बाळासाहेब चौगुले, पुंडलिक पाटील, आनंदा माने, दिलीप पाटील, महादेव पाटील, पांडुरंग खतकर, कृष्णात कांबळे, बाळासो पाटील, सहदेव चौगुले, हनमंत पाटील, आनंदा सुतार, मधुकर खतकर,  दिग्विजय पाटील, पांडुरंग पाटील, धोंडीराम भांडवले, मधुकर चौगले, पुंडलिक भांडवले, प्रमोद बारवाडे, देवदत्त खतकर आदी प्रमुख उपस्थित होते.
         
स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल कुंभार यांनी केले.


शेकडो मंदिराचे बांधकाम आणि जीर्णोद्धाराचे भाग्य परमेश्वराने मिळवून दिल्यामुळेच माझे जीवन कृतार्थ
Total Views: 75