राजकीय
भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; योगासनपटू रोहित चव्हाण यांचा विशेष सत्कार
By Shivani - 8/15/2026 3:58:21 PM
Share This News:
भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; योगासनपटू रोहित चव्हाण यांचा विशेष सत्कार
कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात, नागाळा पार्क येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गुजरात येथे झालेल्या पहिल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारे कोल्हापूरचे योगासनपटू रोहित दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सकाळी ८ वाजता झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहित चव्हाण यांचा विशेष सत्कार
पहिल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी रौप्यपदक मिळवणाऱ्या रोहित दीपकराव चव्हाण यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, ॲड. संपतराव पवार, अमर साठे, गणेश देसाई, डॉ. राजवर्धन, संदीप देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच भरत काळे, दिलीप मेत्राणी, माधुरी नकाते, गायत्री राऊत, रीमा पालनकर, माधवी पाटील, उमा पवार, प्रवीणचंद्र शिंदे, अशोक लोहार, मामा कोळवणकर, सयाजी आळवेकर, राजेश कोगनुळकर, प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, देविदास अवताडे, महेश यादव, अमोल पालोजी, संदीप कुंभार, आप्पा लाड, सचिन सुराणा, झुंबरलाल गांधी, विश्वजीत पवार, भूषण कानकेकर, अनिकेत अतिग्रे, किरण कुलकर्णी, प्रशांत अवघडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुनीता सूर्यवंशी, विशाला कल्याणशेट्टी, संगीता काटकर, देवयानी पाटील, विद्या बनसोडे, श्रद्धा कुलकर्णी, अलका जावीर, अश्विनी वास्कर आणि शुभांगी चितारी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
अरविंद वडगावकर, सुधीर देसाई, नजीर देसाई, तौफिक बागवान, अनिल कामत, दिलीप बोंद्रे, सुरेश गुजर, सचिन पवार, विश्वास पवार, शाहरुख गडवाले, नितीन पवार, प्रसाद पाटोळे, विवेक कोरडे, ईश्वरा पाटील आणि अशोक रामचंदानी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली.
कोल्हापुरात भाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
|