विशेष बातम्या
बकरी ईद (ईदुल अजहा) शनिवार 7 जून 2025 रोजी साजरी होणार – हिलाल कमिटीचा निर्णय
By nisha patil - 5/29/2025 3:23:59 PM
Share This News:
बकरी ईद (ईदुल अजहा) शनिवार 7 जून 2025 रोजी साजरी होणार – हिलाल कमिटीचा निर्णय
कोल्हापूर, : सालाबादप्रमाणे हिलाल कमिटीची बैठक आज मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर येथील कार्यालयात मगरीबच्या नमाजीनंतर मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, आमारते शरिआ (पटना) या ठिकाणच्या हिलाल कमिटी तसेच देशभरातील विविध शहरांशी संपर्क साधण्यात आला.
या ठिकाणी चंद्रदर्शन झाल्याची साक्ष प्राप्त झाल्याने, बकरीद अर्थात ईदुल अजहा शनिवार, दिनांक 7 जून 2025 रोजी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केली.
या प्रसंगी मौ. इरफान कासमी, मौ. मोबीन बागवान, मौ. नाझिम पठाण, मौ. अब्दुस सलाम कासमी, मुफ्ती ताहीर बागवान, हाफीज समीर उस्ताद, मौ. इमरान सन्दी, काजी अश्रफ खान पठाण, हाफिज यूनुस शेख, मौ. अब्दुल वाहिद मिद्दीकी, मौ. अबुतालीब सिद्दीकी तसेच मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मस्जिदचे पेशइमाम व अनेक मान्यवर उपस्थित होते.
बकरी ईद (ईदुल अजहा) शनिवार 7 जून 2025 रोजी साजरी होणार – हिलाल कमिटीचा निर्णय
|