बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पुरोगामी संघर्ष परिषदेकडून साजरी
By Administrator - 4/14/2025 1:26:52 PM
Share This News:
कोल्हापूर :महाराष्ट्र–कर्नाटक राज्यातील पुरोगामी संघर्ष परिषद (पश्चिम महाराष्ट्र) चे उपाध्यक्ष मा. प्रकाश वायदंडे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याचे स्मरण केले.
कार्यक्रमाला मा. महावीर माने, मा. सुरेश समूद्रे, कृष्णात वायदंडे, मा. संदीप वायदंडे, मा. पृथ्वीराज वायदंडे, मा. संस्कार वायदंडे, मा. दिपाली वायदंडे, मा. बाळाबाई बीरांजे, मा. स्वप्नाली माने, मा. सुशीला वायदंडे, मा. रुक्मीनी वायदंडे, मा. प्रतीक्षा वायदंडे, मा. जयसिंग वायदंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्साहात आणि बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक समतेचा आणि संविधानिक मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पुरोगामी संघर्ष परिषदेकडून साजरी
|