राजकीय

कोल्हापूर-सांगली : पालिका निवडणुकीत भाजपचा ठाम निर्णय — ‘त्या’ ३३ जागांवर तडजोड नाही : चंद्रकांत पाटील

chanrakant patil


By nisha patil - 1/11/2025 12:25:11 PM
Share This News:



सांगली : सांगली महानगरपालिकेत भाजपच्या तब्बल ४३ जागा निवडून आल्या असून या जागांबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, अशी ठाम भूमिका उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते तासगाव येथे बोलत होते. पाटील म्हणाले की, भाजप हा राज्यातील सर्वात वेगाने वाढणारा आणि क्रमांक एकचा पक्ष आहे.

त्यामुळे काहींना हे बघवत नाही आणि आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते यशस्वी होणार नाहीत. सांगलीसारख्या ठिकाणीही आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा अशक्य प्रयत्न झाला; पण पक्षात कोणतेही भांडण नाही. महापालिका निवडणुकीत कोणावरही अन्याय होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी शरद पवारांच्या, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आणि मनसे राज ठाकरेंच्या नावाने ओळखले जाणारे पक्ष व्यक्तिनिष्ठ आहेत; मात्र भाजप हा कार्यकर्त्यांच्या नावाने ओळखला जातो, असे मतही पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सांगली महापालिकेत जसे तडजोडीला स्थान नाही तसेच कोल्हापूर महानगरपालिकेत ताराराणी आघाडीसह असलेल्या ३३ जागांवरही कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालकमंत्री पाटील यांनी या भूमिकेद्वारे पक्षांतर्गत वादांवर पडदा टाकत कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे.


कोल्हापूर-सांगली : पालिका निवडणुकीत भाजपचा ठाम निर्णय — ‘त्या’ ३३ जागांवर तडजोड नाही : चंद्रकांत पाटील
Total Views: 47