राजकीय

महिला विद्यार्थी व ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी प्रभाग १५ मध्ये पथदिव्यांचा आग्रह

charati ideal colony street lights demand ajra


By nisha patil - 1/7/2026 10:44:42 AM
Share This News:



आजरा | प्रतिनिधी हसन तकीलदार

आजरा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील चराटी कॉलनी, आपटे कॉलनी, आनंदवन कॉलनी, रवळनाथ कॉलनी आणि आयडियल कॉलनी येथे पथदिवे बसविण्याची मागणी सामाजिक सेवा प्रतिष्ठान, आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात संबंधित भागात रस्त्यांवर पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव असल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अंधारामुळे चोरीसारख्या घटनांची शक्यता वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने पथदिवे बसविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी सूरज सुर्वे यांनी निवेदनात नमूद केलेल्या ठिकाणांना प्राधान्य देत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर महावितरणच्या उपअभियंत्यांनी नगरपंचायतीकडून अतिरिक्त वीजभाराची मागणी प्राप्त होताच आवश्यक अंदाजपत्रक तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार, बाळ केसरकर, किरण कांबळे, पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, जावेदभाई पठाण, संतोष बांदिवडेकर, संजय जोशी यांच्यासह सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.


आजरा प्रभाग १५ मध्ये पथदिव्यांची मागणी नगरपंचायतीचे आश्वासन
Total Views: 171