शैक्षणिक
यशासाठी नियोजन आणि मेहनत महत्त्वाची – प्रा. डॉ. भारत खराटे
By Administrator - 4/13/2025 2:39:40 PM
Share This News:
कोल्हापूर (प्रतिनिधी) – नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी चाटे आयआयटी-नीट अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज, शाहूपुरी व संभाजीनगर शाखांमध्ये स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "अकरावी व बारावी ही दोन वर्षे विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास व कठोर परिश्रमांद्वारे यशाकडे वाटचाल केली पाहिजे."
यावेळी प्राचार्य प्रशांत देसाई, श्रीधर कुलकर्णी, प्रा. मधुकर पाटील यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचा संवाद, नियोजित अभ्यासपद्धती व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष यामुळे यशाच्या संधी अधिक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी श्रुती कुंभार, आयुष पोवार, आदिती कोळेकर, प्रा. प्रदीप भोसले, प्रा. अमर शितोळे, प्रा. विजय मंडलिक, प्रा. सर्जेराव राऊत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. अनेक पालकांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
यशासाठी नियोजन आणि मेहनत महत्त्वाची – प्रा. डॉ. भारत खराटे
|