शैक्षणिक

राष्ट्रीय पातळीवरील जेईई (अ‍ॅडव्हॉन्स) परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे उज्ज्वल यश !

chate jee adv 2025 result


By nisha patil - 2/6/2025 7:08:28 PM
Share This News:



कोल्हापूर - आयआयटीमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई (अ‍ॅडव्हान्स)’ २०२५ या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला. या निकालावरून आयआयटी, एनआयटी, ट्रीपल-आयटी सोबतच पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी, स्पेस सायन्स अ‍ॅण्डटेक्नॉलॉजी, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी यासारख्या विविध पदवीसाठी प्रवेश दिले जातात.
चाटे शिक्षण समुहाच्या ज्युनिअर कॉलेज, क्लासेस, आयआयटी-नीट सेंटरच्या कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा जेईई (अ‍ॅडव्हान्स) या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतही कायम राखली आहे. या प्रवेश परीक्षेत समुहाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवून आपला आयआयटी व राष्ट्रीय पातळीवरील इतर संस्थांमधील प्रवेश पक्का केला आहे. या परीक्षांसाठी राबविण्यात आलेल्या चाटे पॅटर्नचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले. भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी चाटे शिक्षण समुहाचे विद्यार्थी कटीबद्ध राहतील अशी ग्वाही चाटे समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी दिली.


 जेईई-(अ‍ॅडव्हान्स) २०२५ च्या परीक्षेत यशस्वी होऊन आयआयटी व राष्ट्रीय पातळीवरील इतर संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी यशस्वी झालेले चाटे शिक्षण समुहाचे काही विशेष गुणवंत विद्यार्थी - पाटील आयुष, खापणे आर्य, कुंभोजकर मिहीका, खतकर सोहम, पोवार आयुष, कांबळे श्वेता, केसरकर पृथ्वीराज, पांडव संयोगिता

.या सर्व यशस्वीतांना चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक, कॉलेजचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या़.


राष्ट्रीय पातळीवरील जेईई (अ‍ॅडव्हॉन्स) परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे उज्ज्वल यश !
Total Views: 142