बातम्या
कोल्हापूरसाठी ऐतिहासिक पाऊल: मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच १८ ऑगस्टपासून सुरू होणार!
By nisha patil - 1/8/2025 7:09:07 PM
Share This News:
कोल्हापूर, १ ऑगस्ट २०२५ – कोल्हापूरसाठी ऐतिहासिक आणि न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे येत्या १८ ऑगस्ट २०२५ रोजी अधिकृतपणे यासंदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च .
यासंदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च .न्यायालय यांच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले
या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा परिसरातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबादपर्यंत प्रवास करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि खर्चिक दृष्टिकोनातून परवडणारी होणार आहे.
सर्किट बेंचचे कामकाज कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयाच्या विशेष विभागातून सुरू करण्यात येणार असून, सुरुवातीस काही निवडक प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. भविष्यात या बेंचचे स्वरूप वाढवून पूर्णवेळ खंडपीठ स्थापन करण्याच्या दिशेनेही पावले उचलली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हा निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून न्यायाच्या दृष्टीने झगडणाऱ्या कोल्हापूरवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. न्याय मिळण्याचा हक्क आता अधिक जवळ आणि वेगाने मिळणार आहे.
कोल्हापूरसाठी ऐतिहासिक पाऊल
|