राजकीय

मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; मान्यवरांकडून उत्साहात स्वागत

cm kolhapur airport welcome


By Shivani - 9/8/2026 10:56:26 AM
Share This News:



मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी मान्यवरांची मांदियाळी; कोल्हापूर विमानतळावर उत्साहाचा जल्लोष

कोल्हापूर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आज ९.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. विमानतळ परिसरात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होताच उपस्थित मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्नेहपूर्ण वातावरणात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनामुळे विमानतळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामे आणि प्रकल्पांच्या लोकार्पणाचा आणि शुभारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, विकासकामांच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाडगे, पुढारी माध्यम समूहाचे योगेश जाधव, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 


मुख्यमंत्र्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन; मान्यवरांकडून उत्साहात स्वागत
Total Views: 78