बातम्या

CRIME NEWS:हरवलेला मोबाईल अवघ्या ५० मिनिटांत शोधून दिला; पंढरपूर रेल्वे स्टेशनवरील पोलिसांची तत्पर कारवाई

crime news


By nisha patil - 3/7/2025 4:18:30 PM
Share This News:



पंढरपूर – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर रेल्वे स्टेशनवर ड्युटीवर असताना महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे लोहमार्ग) व त्यांच्या टीमने एक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी पार पाडली.

जिंतूर (जि. परभणी) येथील 15 वर्षीय सुमित श्रीराम साबळे या प्रवाशाचा 25,000 रुपये किमतीचा Vivo कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल बुकिंग हॉलमधून हरवला होता. सुमित हा आपल्या कुटुंबासमवेत वारीसाठी पंढरपूरला आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ मोबाईलचे लोकेशन घेतले. अवघ्या ५० मिनिटांत मोबाईल गजानन महाराज मठ, पंढरपूर येथून शोधून काढण्यात आला. सुमित यास मोबाईल सुरक्षितरित्या परत देण्यात आला.

या कामगिरीत महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते (स्थानीय गुन्हे शाखा, पुणे लोहमार्ग), पीएसआय तोडमल (मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे), पीएसआय जाधव (पोलीस मुख्यालय, खडकी), पो.हे.कॉ. 9 ठोंबरे (स्थानिक गुन्हे शाखा), व पो.हे.कॉ. 403 टोणे (पंढरपूर दूरक्षेत्र, कुर्डूवाडी पोलीस ठाणे) यांचा मोलाचा सहभाग होता.

प्रवाशानेही ‘मिशन ट्रस्टेड पॉलिसीग’ अंतर्गत दिलेल्या फीडबॅकमध्ये रेल्वे पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

रेल्वे पोलिसांची ही तत्परता आणि प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास पात्र आहे.

 


हरवलेला मोबाईल अवघ्या ५० मिनिटांत शोधून दिला
Total Views: 317