बातम्या
धन्यकुमार सिदनाळे यांचे निधन | दत्तवाड
By Administrator - 11/25/2026 12:04:51 PM
Share This News:
निष्ठेचा एकनिष्ठ शिलेदार हरपला! कै. धन्यकुमार सिदनाळे (अण्णा) यांचे निधन; दत्तवाडवर शोककळा
पदाचा मोह नाही, सत्तेची हाव नाही; राजकीय परिस्थिती कितीही बदलली तरी आपल्या नेत्याशी आणि गटाशी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहिलेले आमदार राजेंद्र यड्रावकर गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व दत्तवाडचे ज्येष्ठ नेते कै. धन्यकुमार सिदनाळे (अण्णा) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दत्तवाड गावासह राजेंद्र यड्रावकर गटावर शोककळा पसरली आहे.
कै. धन्यकुमार सिदनाळे (अण्णा) यांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात निष्ठा, प्रामाणिकपणा व समर्पणाचा आदर्श निर्माण केला होता. आमदार राजेंद्र यड्रावकर गटाच्या अडचणीच्या काळातही त्यांनी आपल्या नेत्यांची साथ कधी सोडली नाही. राजकीय परिस्थितीत अनेक चढ-उतार आले, मात्र त्यांची निष्ठा कधीही डळमळली नाही. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आयुष्यभर गटाशी प्रामाणिक राहून एकनिष्ठ कार्यकर्त्याची ओळख जपली.
दत्तवाड गावाच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक वाटचालीतही त्यांचे योगदान मोलाचे होते. गावातील विविध घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले. गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या निधनाने दत्तवाड गावाने अनुभवी ज्येष्ठ मार्गदर्शक, तर आमदार राजेंद्र यड्रावकर गटाने निष्ठावंत शिलेदार गमावला आहे. त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन कार्यक्रम : कै. धन्यकुमार सिदनाळे (अण्णा) यांचा रक्षाविसर्जन विधी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता दत्तवाड येथील स्मशानभूमीत होणार आहे.
धन्यकुमार सिदनाळे यांचे निधन | दत्तवाड
|