राजकीय

दोडामार्ग श्रीराम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी सत्याग्रह

dodamarg ram mandir donation box case satyagraha


By Administrator - 9/7/2026 3:40:21 PM
Share This News:



दोडामार्ग : प्रतिनिधि : शुभम गवस

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणाच्या निषेधार्थ दोडामार्ग येथे काँग्रेसच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. श्री सिद्धीविनायक मंदिरात झालेल्या या सत्याग्रहात काँग्रेस व सेवादलाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होत शांततामय मार्गाने निषेध नोंदवला. श्री सिद्धीविनायक मंदिरात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी सामूहिक प्रार्थना केली.

यावेळी ‘रघुपती राघव राजाराम’ या रामधुनीचा अखंड गजर करण्यात आला. रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासारख्या श्रद्धास्थानावरील चोरीच्या घटनेचा निषेध करत, अशा अनिष्ट प्रवृत्तींना सद्बुद्धी मिळावी आणि समाजात शांतता, बंधुभाव व धार्मिक स्थळांविषयी आदर कायम राहावा, यासाठी हा सत्याग्रह करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सत्याग्रहात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष बाबू गवस, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, सुधीर गवस, श्रीकृष्ण गवस, संदीप नाईक, सोनू गवस, मोहन गवस, बाबाजी सावंत, सुशांत बोंद्रे, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत, तुकाराम नाईक, विजय हेरेकर, देवानंद हजारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात रामधुनी गायन, सामूहिक प्रार्थना आणि शांततेचा संदेश देण्यात आला. ‘रघुपती राघव राजाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. समाजात शांतता, सलोखा आणि सद्विचार वाढावेत, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; श्रीराम मंदिर चोरीप्रकरणाचा शांततेत निषेध
Total Views: 104