कृषी
दूधगंगा नदी पुन्हा वाढणार धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासन अलर्ट
By nisha patil - 6/8/2026 5:26:46 PM
Share This News:
दूधगंगा धरणातून उद्या पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर :
दूधगंगा धरणातून उद्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर दूधगंगा नदीकाठावरील गावांमधील नागरिकांनी काळजी घ्यावी, नदीपात्रात उतरू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी, नदीकाठावरील नागरिक आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Dudhganga Dam Water Release
|