बातम्या

माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध

dy patil hospital ex servicemen healthcare kolhapur


By Administrator - 11/26/2026 4:46:39 PM
Share This News:



माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध; कुलगुरूंची ग्वाही

कोल्हापूर :

देशसेवेसाठी आयुष्याची अमूल्य वर्षे समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा देण्यासाठी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध आहे, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल (नि.) डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा सैनिक मंडळ समितीचे उपाध्यक्ष लेफ्टनंट कर्नल (नि.) विलास सुळकुडे यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांनी हॉस्पिटलला भेट देऊन वैद्यकीय सुविधांबाबत प्रशासनाशी चर्चा केली.

यावेळी माजी सैनिकांच्या रेफरल प्रक्रियेला प्राधान्य, नोंदणी व तपासणीसाठी मार्गदर्शन, गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार, एमआरआय व एक्स-रे तपासण्यांसाठी स्वतंत्र वेळ आणि वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी अशा विविध सुविधांबाबत चर्चा झाली.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि ईसीएचएस पॉलीक्लिनिक यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करार झाला असून, त्याअंतर्गत माजी सैनिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते.


माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कटिबद्ध
Total Views: 8