राजकीय

डी वाय पाटील MBA विद्यार्थ्यांना IIM तिरुचिरापल्लीचा अनुभव

dy patil mba students iim tiruchirappalli domestic immersion program


By Shivani - 9/7/2026 5:47:14 PM
Share This News:



कोल्हापूर :

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), तिरुचिरापल्ली येथे पाच दिवसीय डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंग, एआय, जनरेटिव्ह एआय, अॅनालिटिक्स, आयपीओ अँड व्हॅल्युएशन, आंत्रप्रेन्युअरियल फायनान्स, लीडरशिप आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयओटी लॅब, उद्योगभेट, तज्ज्ञांशी संवाद, नेटवर्किंग आणि कॅम्पस एक्स्पोजरचा अनुभव मिळाला.

या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. आसावरी यादव यांनी केले, तर डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. अर्पिता बिदनूरकर आणि श्री. व्यंकटेश बडवे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. आयआयएम तिरुचिरापल्लीचे प्रा. ज्योतिमॉय दलाल, प्रा. गोपीनाथ के., प्रा. गजानंद एम. एस., प्रा. पी. सारवनन यांच्यासह प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


IIM तिरुचिरापल्लीत MBA विद्यार्थ्यांचा इमर्शन प्रोग्राम यशस्वी
Total Views: 10