राजकीय
शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीला संधी द्या : सतेज पाटील
By nisha patil - 1/12/2025 11:50:19 AM
Share This News:
आजरा नगरपंचायत निवडणुकीत चुरशीची लढाई अपेक्षित असून, परिवर्तन विकास आघाडीने प्रचाराची आक्रमक सूत्रे हाती घेतली आहेत. आमदार सतेज पाटील यांनी शहरातील प्रत्येक वॉर्डात सभा घेत आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
प्रभाग क्रमांक १४ चे उमेदवार अभिषेक शिंपी यांनी सांगितले की, सत्तेत आल्यास पर्यावरणपूरक शहर विकास, राज्यातील पहिले स्वतंत्र कृषी धोरण, STP प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, पथविक्रेते-भाजीविक्रेत्यांना सूट, नवीन वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा आणि प्रभाग १४ ला मॉडेल प्रभाग करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
नागरिकांच्या प्राथमिक गरजा, महिला आरोग्य शिबिरे, खेळाडूंसाठी विशेष बजेट, लहान घरांवरील करसूट आणि वाहतूक नियोजनाची खात्री देत त्यांनी मतदारांना परिवर्तन आघाडीला संधी देण्याचे आवाहन केले.
शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीला संधी द्या : सतेज पाटील
|