बातम्या

शहाजी कॉलेजच्या एनसीसी विभागातर्फे सावली केअर सेंटर मध्ये धान्य व फळवाटप

fruits at Savli Care Center by NCC Department of Shahaji College


By nisha patil - 8/16/2025 2:40:12 PM
Share This News:



शहाजी कॉलेजच्या एनसीसी विभागातर्फे सावली केअर सेंटर मध्ये धान्य व फळवाटप 
 

कोल्हापूर- दसरा चौक येथील श्री शहाज छत्रपती महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून सावली केअर सेंटर मध्ये असणाऱ्या वयस्कर रुग्णांना धान्य व फळे वाटप कार्यक्रम करण्यात आला.
 

यावेळी संचालिका  गौरी देशपांडे व आय.क्यू .ए.सी.समन्वयक डॉ. आर डी मांडणीकर उपस्थित होते. एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ प्रशांत पाटील यांनी देश सेवेबरोबर समाजातील सामाजिक बांधिलकी या नात्याने विधायक कार्याचे महत्त्व समजून सांगितले.सावली केअर सेंटर मध्ये असणाऱ्या वयोवृद्ध व पॅरलेसेस सारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या शंभरहून अधिक रुग्णांना विचारपूस करून एनसीसी कॅडेट्नी फळे वाटप केली.
 

या कार्यक्रमाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन  मानसिंग बोंद्रे दादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर के शानेदिवान यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे १०० किलो गहू तसेच ग्रंथपाल डॉ पांडुरंग पाटील यांनी फळ स्वरूपात व डॉ. एन. एस. जाधव यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. डॉ. डि.के.वळवी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. डी एल काशीद पाटील डॉ. डी पी गावडे, विजय लाड व अतुल कांबळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन कॅप्टन डॉ प्रशांत पाटील व प्रा प्रशांत मोटे यांनी केले.


शहाजी कॉलेजच्या एनसीसी विभागातर्फे सावली केअर सेंटर मध्ये धान्य व फळवाटप
Total Views: 116