बातम्या
सोने १.६७ लाखांवर जाणार?
By Administrator - 11/24/2026 11:59:50 AM
Share This News:
२०२८ मध्ये सोने १ लाख ६७ हजारांवर पोहोचणार? गोल्डमन सॅक्सचा मोठा अंदाज
सोन्या-चांदीच्या दरात सध्या मोठी घसरण पाहायला मिळत असली, तरी आगामी काळात सोन्याच्या किमतीत पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील आघाडीची गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने दिलेल्या अंदाजानुसार, २०२८ पर्यंत भारतात १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ६७ हजार २३२ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
'इन्वेस्टिंग डॉट कॉम'च्या वृत्तानुसार, २०२७ च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति ट्रॉय औंस ४,६५० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार भारतीय चलनात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ३८ हजार २११ रुपये होऊ शकतो.
ऑक्टोबरमधील प्रति ट्रॉय औंस ४,१०० डॉलरच्या सरासरी दराच्या तुलनेत ही सुमारे १३ टक्क्यांची वाढ ठरेल. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये व्याजदर कपात सुरू झाल्यास सोन्यातील गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. त्यामुळे आगामी काळात सोने चांदीपेक्षा सरस कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, हे भविष्यातील बाजारभावाचे अंदाज असून प्रत्यक्ष सोन्याचे दर जागतिक बाजारपेठ, डॉलर-रुपया विनिमय दर आणि आर्थिक परिस्थितीनुसार बदलू शकतात.
सोने १.६७ लाखांवर जाणार?
|